आमचे ॲप वापरणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची आम्हाला अत्यंत काळजी आहे. आमची धोरणे आणि अंमलबजावणीची माहिती देण्यात मदत करण्यासाठी आम्ही आत्महत्या, स्वयं-इजा आणि खाण्याच्या विकारांमधील तज्ञांचा नियमितपणे सल्ला घेतो आणि त्रासात असलेल्या लोकांना मदत पुरवण्यासाठी जगभरातील संस्थांबरोबर आम्ही काम करतो.
आम्ही हेतूपूर्वक किंवा नकळतपणे लोकांना आत्महत्या, स्वयं-इजा किंवा खाण्यासंबंधित विकार यांची प्रशंसा करण्यास किंवा त्यास प्रमोट करण्याची परवानगी देत नसताना, आम्ही या विषयावर लोकांनी चर्चा करण्यासाठी परवानगी देतो, कारण आम्हाला वाटते, की आमच्या सर्व्हिस असे स्थान असावे जिथे लोक त्यांचे अनुभव शेअर करू शकतील, या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करू शकतील आणि एकमेकांची मदत घेऊ शकतील. आम्ही हा कंटेन्ट पाहण्याची क्षमता 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांपुरता मर्यादित ठेवतो.
आम्ही आत्महत्या, स्वयं-इजा किंवा खाण्याच्या विकारास प्रोत्साहित करणारा कोणताही कंटेन्ट काढतो ज्यात मीम्स किंवा चित्रे यांसारख्या काल्पनिक कंटेन्टचा आणि संदर्भाचा विचार न करता ग्राफिक असलेल्या कोणत्याही स्वयं-इजेसंबंधित कंटेन्टचा समावेश असतो. आम्ही अत्याधिक वजन कमी करण्याच्या वर्तनासाठी असलेल्या सूचना ज्या कंटेन्टमध्ये आहे तो काढतो. आम्ही आत्महत्या, स्वयं-इजा किंवा खाण्याच्या विकारांना बळी पडलेल्यांची किंवा त्यामधून वाचलेल्यांची थट्टा करणारा कंटेन्टदेखील काढून टाकतो, तसेच आत्महत्या किंवा स्वयं-इजा यांची वास्तविक चित्रणेदेखील आम्ही काढतो. आत्महत्येचे विचार, स्वयं-इजा किंवा खाण्याच्या विकारांपासून बरे होण्याबद्दलचा कंटेन्ट, ज्याला अनुमती आहे परंतु त्यामध्ये अस्वस्थ करू शकणारी अशी प्रतिमा असू शकते ( जसे की बरा झालेला व्रण) जी संवेदनशीलता स्क्रीनच्या मागे ठेवली जाते आणि आम्ही कंटेन्ट पाहण्याची क्षमता 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांपुरती मर्यादित ठेवू.
जेव्हा लोक आत्महत्या, स्वयं-इजा किंवा खाण्याचे विकार यासंबंधित कंटेन्ट पोस्ट करतात किंवा शोधतात तेव्हा आम्ही पाठिंबा देऊ शकणाऱ्या स्थानिक संस्थांकडे त्यांना पाठवू आणि जर आमच्या कम्युनिटी ऑपरेशन कार्यसंघास तात्काळ धोक्याची चिंता वाटत असल्यास आम्ही त्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक आपत्कालीन सेवांशी संपर्क साधू. अधिक माहितीसाठी Meta सुरक्षा केंद्रावर जा.
तज्ञांनी आम्हाला लाईव्ह कंटेन्टच्या बाबतीत असे सांगितले आहे की, एखादी व्यक्ती लाईव्हस्ट्रीम करून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्यास, आम्ही शक्य असेल तोपर्यंत तो कंटेन्ट वर दर्शवणे सुरु ठेवला पाहिजे, कारण ती व्यक्ती जितका जास्त वेळ कॅमेरा चालू ठेवून बोलत राहील तोपर्यंत एखाद्या मित्रास किंवा कुटुंबातील सदस्याला आपत्कालीन सेवेला कॉल करण्याची संधी मिळेल. तथापि, हा कंटेन्ट पाहून इतरांवर नकारात्मकरित्या प्रभाव पडण्याची जोखीम कमी करण्यासाठी, ज्या पॉईंटवर धमकी ही प्रयत्नात रूपांतरित होऊ शकते त्या पॉईंटवर आम्ही लाईव्हस्ट्रीम थांबवू. वर नमूद केल्याप्रमाणे, कोणत्याही केसमध्ये, जर एखाद्या व्यक्तीला स्वतःला इजा करून घेण्याचा धोका असल्याचे आम्हाला आढळले तर, आम्ही आपत्कालीन सेवांशी संपर्क साधू.