स्पॅम

धोरण तपशील

बदल लॉग
धोरण तर्क
कृत्रिमपणे दर्शकता वाढवण्यासाठी युजरना फसवण्याकरिता, दिशाभूल करण्‍याकरिता किंवा दडपून टाकण्‍याकरिता डिझाइन केलेल्या कंटेन्टला आम्ही अनुमती देत नाही. हा कंटेन्ट लोकांची आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रामाणिकपणे एगेंज होण्याची क्षमता कमी करतो आणि आमच्या सर्व्हिसची सुरक्षा, स्थिरता आणि उपयोगिता धोक्यात आणू शकतो. दिशाभूल करणाऱ्या कार्यक्षमता किंवा कोडद्वारे संशय न घेणाऱ्या युजरना नेण्यासाठी किंवा एका विश्वासू डोमेनची तोतयागिरी करण्यासाठी फसव्या लिंकचा प्रसार करणे यासारख्या गैरवर्तनात्मक युक्त्या प्रतिबंधित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
ऑनलाईन स्पॅम हा आकर्षित करणारा उद्योग आहे. वाढणाऱ्या स्पॅम ट्रेंड आणि युक्त्यांबाबत सतर्क राहण्यासाठी आमची धोरणे आणि शोधण्याची कार्ये सातत्याने प्रगत होत आहेत. स्पॅमविरोधात लढा देण्याच्या दृष्टीने कृती करण्यात, आम्ही आमच्या कम्युनिटीची जोशपूर्ण, अस्सल ॲक्टिव्हिटीचे संरक्षण करण्यासह त्याच्या निर्मात्यांच्या आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरील वितरकांच्या वाढणाऱ्या खर्चात संतुलन साधत आहोत.
आम्ही यास अनुमती देत नाही:
  • अत्याधिक वारंवारपणे, व्यक्तिचलितपणे किंवा स्वयंचलितपणे कंटेन्ट पोस्ट, शेअर करणे, त्यासोबत एंगेज होणे किंवा खाती, ग्रुप, पेज, इव्हेंट किंवा इतर ॲसेट तयार करणे.
    • आम्ही अशा खात्यांवर निर्बंध लावू शकतो जे कमी वारंवारतेवर कार्य करत आहेत जेव्हा स्पॅमची इतर सूचके (उदा. पुनरावृत्ती होणारा कंटेन्ट पोस्ट करणे) किंवा अप्रामाणिकतेचे सिग्नल उपस्थित असतात.
  • खाती, ग्रुप, पेज यांसारखी प्लॅटफॉर्म ॲसेट यशस्वीपणे विकणे, खरेदी करणे किंवा विनिमय करणे किंवा तसा प्रयत्न करणे.
  • ॲडमिन किंवा मॉडरेटर भूमिका किंवा विशिष्ट जागांमध्‍ये पोस्ट करण्यासाठी परवानग्या यांसारखे साईट अधिकार यशस्वीपणे विकणे, खरेदी करणे किंवा विनिमय करणे किंवा तसा प्रयत्न करणे.
  • स्पष्टपणे निर्धारित केलेल्या ब्रँडेड कंटेन्टशिवाय, आमच्या परिभाषित केल्यानुसार, एखाद्या आर्थिक मूल्यासाठी कंटेन्ट यशस्वीपणे विकणे, खरेदी करणे किंवा विनिमय करणे किंवा तसा प्रयत्न करणे ब्रँडेड कंटेन्ट धोरण.
  • लाइक, शेअर, व्ह्‍यू, फॉलो, क्लिक, विशिष्ट हॅशटॅगचा वापर इ. सारख्या एंगेजमेंटसाठी यशस्वीपणे विकणे, खरेदी करणे किंवा विनिमय करणे किंवा तसा प्रयत्न करणे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
    • एंगेजमेंटच्या बदल्यात रोख रक्कम किंवा रोख रकमेच्या समतुल्याचे गिव्हअवे (म्हणजे., इतरांना जिंकण्‍यासाठी एक संधी ऑफर करणे) ऑफर करणे. (उदा, “माझे पेज लाईक करणारी कोणतीही व्यक्ती $500 जिंकण्यासाठी प्रवेश करू शकते”)
    • एंगेजमेंटच्या बदल्यात आर्थिक मूल्याचे काहीही प्रदान करण्यासाठी ऑफर करणे. (उदा, “तुम्ही माझ्या पेजला लाईक केल्यास, मी तुम्हाला एक iPhone देईन!”)
  • आश्वासन दिलेला कंटेन्ट युजरने पाहण्यापूर्वी किंवा त्यासोबत इंटरॅक्ट करण्यापूर्वी त्यांनी कंटेन्टसोबत एंगेज (उदा, लाईक, शेअर करणे) होणे आवश्यक करणे किंवा तसा क्लेम करणे.
  • भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या URL, डोमेन किंवा ॲप्लिकेशन शेअर करणे यात यांचा समावेश आहे:
    • क्लोकिंग: क्लोकिंग म्हणजे आमच्या अखंडतेच्या सिस्टीमच्या विरोधात युजरना काय दर्शवले जाते याविषयी URL किंवा ॲप्लिकेशन यांसारखा भिन्न प्लॅटफॉर्म-बाहेरील कंटेन्ट हेतूपूर्वक सादर करून आमची कंटेन्टविषयक धोरणे टाळण्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न.
    • दिशाभूल करणाऱ्या लिंक: कंटेन्टमध्ये एक अशी लिंक आहे जी एका प्रकारच्या कंटेन्टचे आश्वासन देते परंतु काहीतरी अगदी भिन्न डिलिव्हर करते.यात वचन दिलेल्या ॲप किंवा सॉफ्टवेअरमधील कंटेन्ट समाविष्ट होऊ शकतो.
    • भ्रामक पुनर्निर्देशित वर्तणूक: अशा वेबसाईट ज्यांच्याकरिता अपेक्षित लँडिंग पेज कंटेन्ट पाहण्यासाठी आणि आवश्यक कृती पूर्ण झाल्यानंतर बदललेले URL चे डोमेन नाव पाहण्यासाठी किंवा कोणत्याही युजरच्या कृतीशिवाय स्वयंचलितपणे युजरना बऱ्याच प्रमाणात भिन्न असलेल्या डोमेनवर पुनर्निर्देशित करण्यासाठी क्रिया (उदा. कॅप्चा, ॲड पहा, येथे क्लिक करा) आवश्यक आहे.
    • लाईक/शेअर-गेटिंग: विशिष्ट, खास कंटेन्टचा ॲक्सेस मिळवण्यासाठी युजरना एंगेज (लाईक, शेअर, फॉलो या स्वरूपात किंवा लोकांच्या समोर राहण्याचे इतर कोणतेही स्वरूप) होणे आवश्यक करणे.
    • भ्रामक प्लॅटफॉर्म कार्यक्षमता - युजरद्वारे एक लिंक फॉलो करून घेण्यासाठी आमच्या वैशिष्ट्यांच्या किंवा सर्व्हिसच्या कार्यक्षमतेची नक्कल करणे, जसे की सहाय्यता निधी, लाईन-मधील मतचाचण्या, प्ले बटणे किंव लाईक करा बटण यांची नक्कल करणे जिथे ती कार्यक्षमता अस्तित्वात नसते किंवा अपेक्षेनुसार कार्य करत नसते.
    • भ्रामक लँडिंग पेज कार्यक्षमता: अशा वेबसाईट ज्यांमध्ये एक दिशाभूल करणारा युजर इंटरफेस असतो ज्यामुळे ट्रॅफिक अयोग्यपणे जनरेट केले जाते (उदा. पॉप- अप्स/अंडर्स, क्लिकजॅकिंग, इ.).यात ट्रॅपिंग सारख्या युक्त्या समाविष्ट असतात, जिथे एखादी व्यक्ती लॅंडिंग पेज सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा असंबद्ध पॉप-अप्स दिसतात.
    • लँडिंग पेज किंवा डोमेनची तोतयागिरी अन्य एखाद्या विश्वासू साईटच्या पेजसारख्या असलेल्या लॅंडिंग पेजचा वापर करून, सुप्रिसद्ध वेबसाईट, डोमेन किंवा ब्रँडची तोतयागिरी करण्यासाठी टायपो, शब्लेखनातील चुका दर्शवून किंवा इतर माध्यमांद्वारे नाव, डोमेन किंवा कंटेन्टचा वापर करून प्लॅटफॉर्म-बाहेरील लॅंडिंग पेज, URL किंवा बाह्य वेबसाईट किंवा डोमेन जे एक प्रतिष्ठित ब्रॅंड किंवा सर्व्हिस असल्याचे ढोंग करते.
    • URL किंवा लिंकचे इतर भ्रामक वापर जे वरील बाबींशी बऱ्याच प्रमाणात सारखे आहेत.
  • उपरोक्त असूनदेखील, आम्ही यास प्रतिबंधित करत नाही:
    • असे क्रॉस प्रमोशन जे तृतीय पक्षाच्या पेमेंटद्वारे ट्रिगर होत नाही
    • एखाद्या पेजसाठी किंवा ग्रुपसाठी असलेल्या ॲडमिन किंवा मॉडरेशनच्या जबाबदाऱ्या अन्य युजरना मूल्याच्या विनिमयाच्याऐवजी त्यांच्या पेज किंवा ग्रुपमधील रूचींवर आधारित ट्रान्स्‍फर करणे.
    • स्पष्टपणे निर्धारित केलेला ब्रँडेड कंटेन्ट पोस्ट किंवा शेअर करणे.
युजर अनुभव
Facebook वरील लोकांसाठी अंमलबजावणी कशी दिसते याची काही उदाहरणे पहा, जसे की: Facebook वर काहीतरी असू नये असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची तक्रार केल्यावर ते कसे दिसते, आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे तुम्ही उल्लंघन केले आहे असे सांगितले जाणे आणि ठराविक कंटेन्टवर दिसणारी चेतावणी स्क्रीन.
टीप: आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत, त्यामुळे तुम्हाला इथे जे दिसते आहे, ते कदाचित आम्ही सध्या वापरत असल्यापेक्षा थोडे जुने असू शकते.
युजर अनुभव
रिपोर्टिंग
युजर अनुभव
रिपोर्ट-कम्युनिकेशन
युजर अनुभव
टेकडाऊन अनुभव
युजर अनुभव
चेतावणी स्क्रीन
डेटा
सर्वात अलीकडील कम्युनिटी स्टँडर्डचा अंमबजावणी रिपोर्ट पहा
अंमलबजावणी
Facebook वर प्रत्येकासाठी, जगभरामध्ये सर्वत्र आमची धोरणे समान आहेत.
रिव्ह्यू टीम
आमची 15,000 पेक्षा जास्त रिव्ह्यूकर्त्यांची जागतिक टीम ही दररोज Facebook वरील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहे.
भागधारक प्रतिबद्धता
Facebook कम्युनिटी स्टॅंडर्डची माहिती देण्यासाठी बाहेरील तज्ञ, शिक्षणतज्ञ, एनजीओ आणि धोरणकर्ते मदत करत आहेत.
स्पॅम यासंबंधित मदत मिळवा
तुम्ही Facebook वर आमच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या विरुद्ध जाणारे काही पाहिल्यास तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या.
आमच्या मदत केंद्राला भेट द्या