Meta बौद्धिक संपदा आणि परवाने वापरणे

धोरण तपशील

बदल लॉग
धोरण तर्क
Meta त्याच्या बौद्धिक मालमत्तेच्या विकासासाठी, संरक्षणासाठी आणि योग्य वापरासाठी भरीव संसाधने समर्पित करते. हे धोरण हे सुनिश्चित करण्यात मदत करते की, Meta च्या बौद्धिक संपत्तीचा वापर बेकायदेशीरपणे, आमच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय किंवा आमच्या ब्रँड संसाधन केंद्राशी विसंगत नसलेल्या पद्धतीने केला जात नाही.
असा कंटेन्ट पोस्ट करू नका जो:
  • ब्रॅंडचा वापर:
    • Meta चे कॉफीराईट किंवा ट्रेडमार्क Meta च्या पूर्वलिखित परवानगीशिवाय किंवा Meta ब्रँड संसाधन केंद्राने प्रतिबंधित केलेल्या पद्धतीने वापरतो.
    • Meta च्या कोणत्याही ब्रॅंडना अशा पद्धतींनी दर्शवतो ज्यामुळे तो क्रिएटिवव्हचे सर्वाधिक ठळक किंवा प्रमुख वैशिष्ट्य बनेल.
    • Meta च्या ब्रॅंड ॲसेट कोणत्याही पद्धतीने सुधारित करतो, जसे की डिझाइन किंवा रंग बदलणे किंवा त्यांचा वापर विशेष प्रभाव किंवा ॲनिमेशनच्या हेतूसाठी करतो.
  • ब्रँडचे समर्थन:
    • Meta च्या पूर्वलिखित परवानगीशिवाय, Metaच्या कोणत्याही ब्रॅंड्‍ससोबत कोणत्याही प्रकारचे समर्थन किंवा भागीदारी ध्वनित करते.
    • Meta च्या पूर्वलिखित परवानगीशिवाय, Metaच्या कोणत्याही ब्रॅंड् (जसे की Facebook, Instagram किंवा WhatsApp), तंत्रज्ञान किंवा प्रोग्रामद्वारे समर्थन किंवा सपोर्ट ध्वनित करते.
  • कोणत्याही प्रॉडक्टच्या युजर इंटरफेसचे अशा पद्धतीने वर्णन करते:
    • जे प्रॉडक्टच्या सद्य अपिअरंस, वैशिष्ट्ये किंवा कार्यक्षमतेचे चुकीचे वर्णन असते.
    • खास इफेक्ट, हस्तक्षेप किंवा ॲनिमेशन जोडण्यासारख्या, कोणत्याही पद्धतीने युजर इंटरफेस सुधारित करते.
    • युजर इंटरफेसचे घटक स्वतंत्रपणे किंवा वैयक्तिकपणे वापरते
    • मोबाईल किंवा डेस्कटॉपसारख्या समर्पक डिव्हाईसच्या संदर्भात युजर इंटरफेसचे वर्णन करत नाही.
  • Meta च्या संगीत परवाना करारांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने संगीत किंवा इतर कंटेन्ट वापरते.
  • Meta च्या-मालकीचा आणि/किंवा खास परवानाकृत Facebook Watch कंटेन्ट पूर्वलिखित परवानगीशिवाय स्ट्रीम करते.
  • पूर्वलिखित परवानगीशिवाय Meta चे मालकीचे बौद्धिक संपदा हक्क वापरते.
  • Meta च्या ट्रेडमार्कसारखी असलेली गोंधळात टाकणारी चिन्हे वापरते.
आम्ही काढून टाकतो:
  • अशी खाती जी या धोरणाचे वारंवार उल्लंघन करण्यात एंगेज असतात, यात काढून टाकल्यानंतर नवीन खाती तयार करण्याचा समावेश आहे.
Meta च्या मालकीचा आणि/किंवा त्याद्वारे परवानाकृत केलेल्या बौद्धिक संपदा हक्कांचा वापर अशा पद्धीतने करणाऱ्या कंटेन्टला आम्ही अनुमती देतो:
  • Meta ने लेखी स्वरूपात स्पष्टपणे दिलेली परवानगी आणि/किंवा
  • Meta ब्रँड संसाधन केंद्र यामधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुसंगत असलेला.
युजर अनुभव
Facebook वरील लोकांसाठी अंमलबजावणी कशी दिसते याची काही उदाहरणे पहा, जसे की: Facebook वर काहीतरी असू नये असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची तक्रार केल्यावर ते कसे दिसते, आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे तुम्ही उल्लंघन केले आहे असे सांगितले जाणे आणि ठराविक कंटेन्टवर दिसणारी चेतावणी स्क्रीन.
टीप: आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत, त्यामुळे तुम्हाला इथे जे दिसते आहे, ते कदाचित आम्ही सध्या वापरत असल्यापेक्षा थोडे जुने असू शकते.
युजर अनुभव
रिपोर्टिंग
युजर अनुभव
रिपोर्ट-कम्युनिकेशन
युजर अनुभव
टेकडाऊन अनुभव
युजर अनुभव
चेतावणी स्क्रीन
अंमलबजावणी
Facebook वर प्रत्येकासाठी, जगभरामध्ये सर्वत्र आमची धोरणे समान आहेत.
रिव्ह्यू टीम
आमची 15,000 पेक्षा जास्त रिव्ह्यूकर्त्यांची जागतिक टीम ही दररोज Facebook वरील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहे.
भागधारक प्रतिबद्धता
Facebook कम्युनिटी स्टॅंडर्डची माहिती देण्यासाठी बाहेरील तज्ञ, शिक्षणतज्ञ, एनजीओ आणि धोरणकर्ते मदत करत आहेत.
Meta बौद्धिक मालमत्ता आणि परवाने वापरण्याबाबत मदत मिळवा
तुम्ही Facebook वर आमच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या विरुद्ध जाणारे काही पाहिल्यास तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या.
आमच्या मदत केंद्राला भेट द्या