तृतीय-पक्ष बौद्धिक संपदांचे उल्लंघन

धोरण तपशील

बदल लॉग
धोरण तर्क
Meta बौद्धिक संपदा हक्क गंभीरतेने घेते आणि कम्युनिटीच्या विश्वासावर तयार केलेल्या जागेत अभिव्यक्ती, क्रिएटिव्हिटी आणि नावीन्यतेस प्रमोट करताना या अधिकारांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे.
या कारणासाठी, कॉपीराइट, ट्रेडमार्क किंवा इतर कायदेशीर अधिकारांसह, अन्य एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करणारा कंटेन्ट पोस्ट करण्याच्या विरोधात आम्ही एक धोरण लागू करतो. आम्हाला आमच्या बौद्धिक संपदा पारदर्शकता रिपोर्ट मध्ये प्राप्त होते त्या बौद्धिक संपदा रिपोर्टची माहिती आम्ही प्रकाशित करतो.
तुमच्यामते तुमच्या बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या कंटेन्टची तक्रार करण्यासाठी, कृपया आमच्या बौद्धिक संपदा मदत केंद्राला भेट द्या, आमच्या व्यवसाय संरक्षण पेजला भेट द्या किंवा ब्रँड अधिकार संरक्षण च्या ॲक्सेससाठी अर्ज करण्याचा विचार करा.
अधिकार धारक किंवा अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून तक्रारीची पावती प्राप्त झाल्यावर आम्ही त्यात समाविष्ट असलेला कंटेन्ट काढून टाकू किंवा त्यावर निर्बंध घालू:
  • कॉपीराइट उल्लंघन.
  • ट्रेडमार्क उल्लंघन.
  • बनावटी वस्तूंची विक्री किंवा प्रमोशन
  • ब्रँड(ड्‍स) सह असत्य संबद्धता
  • बौद्धिक संपदा हक्कांचे किंवा इतर मालकी अधिकारांचे इतर कोणतेही उल्लंघन
आम्ही असा कोणताही कंटेन्ट काढून टाकतो ज्यामध्ये:
  • अशी लक्षणे असतात जी सूचित करतात की कंटेन्ट बनावटी किंवा ब्रॅंडेड वस्तूंची विक्री करतो किंवा त्यांना प्रमोट करतो
  • संशयास्पद बनावटी वस्तूंची विक्री किंवा प्रमोशन करण्यास समर्पित असलेल्या वेबसाईटच्या प्लॅटफॉर्म-बाहेरील लिंक असतात
  • जो संशयास्पद बनावटी वस्तूंची विक्री करतो किंवा त्यांना प्रमोट करतो ज्या तंतोतंत किंवा अत्याधिक प्रमाणात अशा कंटेन्टमधील वस्तूंसारख्या असतात ज्यांची तक्रार अधिकारधारकाने बनावटी म्हणून आधी केलेली आहे
  • संशयास्पद कॉपीरराइट उल्लंघन शेअर, प्रमोट किंवा सुलभ करतो
आम्ही अशी खाती काढतो जी:
  • या धोरणाचे वारंवार उल्लंघन करण्यात एंगेज असतात.
आम्ही अशा कंटेन्टला अनुमती देतो जो अधिकारधारकाद्वारे अधिकृत असतो आणि स्थापित योग्य वापराबाबतची मूलभूततत्त्वे फॉलो करतो
युजर अनुभव
Facebook वरील लोकांसाठी अंमलबजावणी कशी दिसते याची काही उदाहरणे पहा, जसे की: Facebook वर काहीतरी असू नये असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची तक्रार केल्यावर ते कसे दिसते, आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे तुम्ही उल्लंघन केले आहे असे सांगितले जाणे आणि ठराविक कंटेन्टवर दिसणारी चेतावणी स्क्रीन.
टीप: आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत, त्यामुळे तुम्हाला इथे जे दिसते आहे, ते कदाचित आम्ही सध्या वापरत असल्यापेक्षा थोडे जुने असू शकते.
युजर अनुभव
रिपोर्टिंग
युजर अनुभव
रिपोर्ट-कम्युनिकेशन
युजर अनुभव
टेकडाऊन अनुभव
युजर अनुभव
चेतावणी स्क्रीन
अंमलबजावणी
Facebook वर प्रत्येकासाठी, जगभरामध्ये सर्वत्र आमची धोरणे समान आहेत.
रिव्ह्यू टीम
आमची 15,000 पेक्षा जास्त रिव्ह्यूकर्त्यांची जागतिक टीम ही दररोज Facebook वरील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहे.
भागधारक प्रतिबद्धता
Facebook कम्युनिटी स्टॅंडर्डची माहिती देण्यासाठी बाहेरील तज्ञ, शिक्षणतज्ञ, एनजीओ आणि धोरणकर्ते मदत करत आहेत.
तृतीय-पक्ष बौद्धिक संपदा उल्लंघनासाठी मदत मिळवा
तुम्ही Facebook वर आमच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या विरुद्ध जाणारे काही पाहिल्यास तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या.
आमच्या मदत केंद्राला भेट द्या