खाते एकीकरण

धोरण तपशील

बदल लॉग
धोरण तर्क
सुरक्षित वातावरण राखण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सशक्त करण्यासाठी, आम्ही कम्युनिटीसाठी हानिकारक असलेली खाती प्रतिबंधित करतो किंवा काढून टाकतो. आमच्या कोणत्याही प्रॉडक्टमध्ये आमच्या धोरणांचे अत्यंत वाईट किंवा सातत्याने उल्लंघन करण्यासाठी वापरलेली खाती प्रतिबंधित करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी आम्ही स्वयंचलित आणि मॅन्युअल सिस्टीमचे संयोजन तयार केले आहे.
खाते काढून टाकणे ही एक गंभीर कारवाई असल्याने, शक्य असेल तेव्हा, आम्ही आमच्या कम्युनिटीला आमचे नियम शिकण्याची आणि आमच्या कम्युनिटी स्टँडर्डला फॉलो करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, आम्ही प्रत्येक वेळेस कंटेन्ट काढून टाकतो तेव्हा एक नोटिफिकेशन जारी केली जाते आणि बहुतेक केसमध्ये आम्ही लोकांना उल्लंघनाच्या स्वरूपाबद्दल आणि लागू असलेल्या कोणत्याही प्रतिबंधांबद्दल माहितीदेखील प्रदान करतो. आमच्या अंमलबजावणीच्या कृती उल्लंघनाची तीव्रता, खात्यावरील उल्लंघनांचा इतिहास आणि कम्युनिटीला निर्माण झालेल्या धोक्याच्या किंवा हानीच्या प्रमाणात तयार केल्या आहेत. वारंवार चेतावण्या देऊन आणि प्रतिबंध घालूनही नित्य होणार्‍या उल्लंघनांमुळे किंवा गंभीर सुरक्षेचे धोके उत्त्पन्न करणाऱ्या उल्लंघनामुळे खाते अक्षम केले जाईल.
Meta तिची धोरणे कशी लागू करते आणि खाती कशी प्रतिबंधित करते याबद्दल पारदर्शकता केंद्र यामध्‍ये अधिक जाणून घ्या.
आम्ही खाती, इतर घटक (पेज, ग्रुप, इव्हेंट) किंवा व्यवसाय ॲसेट (व्यवसाय व्यवस्थापक, जाहिरात खाती) प्रतिबंधित किंवा अक्षम करू शकतो जे:
  • भीषण हानींमध्ये गुंतलेले असून, आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन करतात, यात व्यक्ती किवा सार्वजनिक सुरक्षेस होणाऱ्या तात्काळ जोखमीमुळे आम्ही कायदा अंमलबजावणीचा ज्यांचा संदर्भ देतो त्यांचा समावेश आहे
  • व्यक्ती किवा सार्वजनिक सुरक्षेस होणाऱ्या तात्काळ जोखमीमुळे कायदा अंमलबजावणीस रेफरलचे वारंट देणाऱ्या कोणत्याही हानींमध्ये गुंतलेले असून आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन करतात
  • भ्रामक किंवा धोकादायक व्यवसाय हानींमध्ये गुंतलेले असून आमच्या जाहिरात स्टॅंडर्डचे उल्लंघन करतात
  • उल्लंघन करणारा कंटेन्ट पोस्ट करून आणि/किंवा उल्लंघन करणाऱ्या घटकांना किंवा व्यवसाय ॲसेटना व्यवस्थापित करून सातत्याने आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन करतात
  • सातत्याने आमच्या जाहिरात स्टॅंडर्डचे उल्लंघन करतात
  • स्पष्ट उल्लंघन करणाऱ्या हेतूची सूचक ॲक्टिव्हिटी किंवा वर्तन प्रदर्शित करा
आम्ही खाती, इतर घटक (पेज, ग्रुप, इव्हेंट) किंवा व्यवसाय ॲसेट (व्यवसाय व्यवस्थापक, जाहिरात खाती) प्रतिबंधित किंवा अक्षम करू शकतो:
  • अक्षम केलेल्या खात्याच्या रूपात एकाच व्यक्तीच्या किंवा घटकाच्या मालकीचे असतात
  • ज्यांचे पूर्वी काढलेल्या खात्यांच्या किंवा घटकांच्या रूपातील सामायिक असलेली मालकी आणि कंटेन्ट असे मूल्याकंन केलेल्यांसह, पूर्वीचे खाते किंवा घटक काढणे टाळण्यासाठी खाते किंवा घटक तयार केलेले किंवा पुनर्प्रयोजन केलेले असते
  • एखाद्या युजरशी संपर्क करण्यासाठी तयार केलेले असते ज्याने खाते ब्लॉक केलेले आहे
  • अन्यथा आमच्या कायदा अंमलबजावणीच्या कारवाया किंवा रिव्ह्यू प्रक्रिया टाळण्यासाठी वापरले जाते
आम्ही खाती, इतर घटक (पेज, ग्रुप, इव्हेंट) किंवा व्यवसाय ॲसेट (व्यवसाय व्यवस्थापक, जाहिरात खाती) प्रतिबंधित किंवा अक्षम करू शकतो जी हे सिद्ध करतात:
  • आमच्या धोरणांना टाळणाऱ्या किंवा त्यांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांच्या नेटवर्कशी किंवा इतर घटकांशी असलेला जवळचा संबध
  • आमच्या धोरणांचे सातत्याने किंवा गंभीरपणे उल्लंघन करणाऱ्या खात्यांच्या किंवा इतर घटकांच्या नेटवर्कमधील समन्वय
  • खात्यांच्या नेटवर्कद्वारे स्पष्ट उल्लंघन करणाऱ्या हेतूची सूचक ॲक्टिव्हिटी किंवा वर्तन
आम्ही अशी खाती किंवा इतर घटक (पेज, ग्रुप, इव्हेंट) किंवा व्यवसाय ॲसेट (व्यवसाय व्यवस्थापक, ॲड खाती) प्रतिबंधित किंवा अक्षम करण्यासाठी काम करू, जी प्लॅटफॉर्म बाहेरील ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज होतात ज्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवर हानी पोहोचू शकते, यात यांचा समावेश आहे:
  • दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगाराच्या मालकीचे, मुलांच्या किंवा प्रौढांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेले
  • नेमून दिलेल्या घटकाच्या किंवा त्यांच्यावतीने संचालित केलेले
  • लागू होणाऱ्या कायद्यांतर्गत आमचे प्रॉडक्ट, सर्व्हिस किंवा सॉफ्टवेअर प्राप्त करण्यास प्रतिबंधित केलेले
खालील बाबतीत, आम्ही मालकी आणि/किंवा परवानगी असलेल्या ॲक्टिव्हिटीची तपासणी करण्यासाठी एखाद्या खात्याबद्दल अतिरिक्त माहितीची विनंती करू शकतो:
  • बळकावलेली खाती
  • ऑटोमेटेड माध्यमांद्वारे एखादे खाते तयार करणे किंवा ते वापरणे, जसे की स्क्रिप्ट करणे (स्क्रिप्ट करण्याची स्क्रिप्ट ॲक्टिव्हटी अधिकृत मार्गांद्वारे होत नसेल आणि आमच्या धोरणांचे उल्लंघन होत नसेल तोपर्यंत)
  • दीर्घकालीन निष्क्रियतेसह रिक्त खाती
युजर अनुभव
Facebook वरील लोकांसाठी अंमलबजावणी कशी दिसते याची काही उदाहरणे पहा, जसे की: Facebook वर काहीतरी असू नये असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची तक्रार केल्यावर ते कसे दिसते, आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे तुम्ही उल्लंघन केले आहे असे सांगितले जाणे आणि ठराविक कंटेन्टवर दिसणारी चेतावणी स्क्रीन.
टीप: आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत, त्यामुळे तुम्हाला इथे जे दिसते आहे, ते कदाचित आम्ही सध्या वापरत असल्यापेक्षा थोडे जुने असू शकते.
युजर अनुभव
रिपोर्टिंग
युजर अनुभव
रिपोर्ट-कम्युनिकेशन
युजर अनुभव
टेकडाऊन अनुभव
युजर अनुभव
चेतावणी स्क्रीन
डेटा
सर्वात अलीकडील कम्युनिटी स्टँडर्डचा अंमबजावणी रिपोर्ट पहा
अंमलबजावणी
Facebook वर प्रत्येकासाठी, जगभरामध्ये सर्वत्र आमची धोरणे समान आहेत.
रिव्ह्यू टीम
आमची 15,000 पेक्षा जास्त रिव्ह्यूकर्त्यांची जागतिक टीम ही दररोज Facebook वरील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहे.
भागधारक प्रतिबद्धता
Facebook कम्युनिटी स्टॅंडर्डची माहिती देण्यासाठी बाहेरील तज्ञ, शिक्षणतज्ञ, एनजीओ आणि धोरणकर्ते मदत करत आहेत.
खात्याच्या अखंडतेसाठी मदत मिळवा
तुम्ही Facebook वर आमच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या विरुद्ध जाणारे काही पाहिल्यास तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या.
आमच्या मदत केंद्राला भेट द्या